Swati Maliwal । स्वाती मालीवाल प्रकरणात आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी बिभव कुमारच्या वडिलांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
भाजपवर मोठा आरोप
बिभव कुमारचे वडील महेश्वर राय यांनी म्हटले आहे की, ‘त्यांचा मुलगा गेल्या 15 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे आणि त्यांनी त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार ऐकलेली नाही. भाजप बिभव यांना अरविंद केजरीवाल यांना सोडण्याचा सल्ला देत असल्याचा दावाही महेश्वर राय यांनी केला.’
वृत्तसंस्थेशी बोलताना बिभव कुमारचे वडील महेश्वर राय म्हणाले, “भाजपचे लोक सतत बिभवला सांगत आहेत की, केजरीवालला सोड, मग काहीही नुकसान होणार नाही. या घटनेनंतरही मी बिभवशी बोललो आणि त्याने सांगितले की, तो नाश्ता करत होता आणि स्वाती मालीवाल काहीतरी मोठे काम करण्यासाठी आल्या होत्या. यानंतर सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले आणि बिभव तेथे गेला. बिभवने स्वातीला एकदाही हात लावला नाही.’ असा दावाही त्यांनी केला आहे.
बिभव कुमारचे वडील महेश्वर राय पुढेसांगितले
“गार्डने स्वाती मालीवाल यांना एवढेच सांगितले होते की, बिभवला विचारल्याशिवाय तो त्यांना केजरीवालांना भेटू देणार नाही. हे ऐकताच स्वाती मालीवाल संतापल्या आणि धमक्या देऊ लागल्या.’ दरम्यान, बिभव कुमार यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
पोलीस कोठडीत आरोपी
तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारीच बिभव कुमारला ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती. बिभव कुमारची सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. ताब्यात घेतल्यानंतर लगेचच बिभव कुमारने अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता, तो फेटाळण्यात आला होता.