कराड -रेल्वे स्टेशन-एमएसईबी रस्त्यावर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या संग्राम प्रल्हाद पवार (वय 30, रा. हजारमाची, ता. कराड) याला पोलिसांनी गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संग्राम पवार हा रेल्वे स्टेशन-एमएसईबी रस्त्यावर पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी परिसरात आज पहाटे 5 च्या सुमारास सापळा रचला.
त्यावेळी संग्राम पवार हा रिक्षातून बनवडीकडे जाताना दिसला. पोलिसांनी रिक्षा थांबवून संग्रामची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तूल सापडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल वरोटे तपास करत आहेत.