नवी दिल्ली : भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) तयार केलेल्या नव्या नियामलीनुसार दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेने १९ वर्षांखालील संघातील क्रिकेटपटू मनजोत कालरा याच्यावर वय चोरी केल्यामुळे २ वर्षांची बंदी लावली आहे.
Former India U-19 World Cup hero Manjot Kalra suspended from playing Ranji Trophy for 1 year on charges of age-fudging in junior cricket. #BCCI #CRICKET
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2020
रणजी क्रिकेटमधून एका वर्षासाठी निलंबन ही मुख्य शिक्षा असली तरी त्यासह त्याला दोन वर्षे वयोगटाचे क्रिकेट खेळता येणार नाही. दिल्ली असोसिएशनचे मावळते लोकपाल बद्र दुरेझ अहमद यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी ही शिक्षा सुनावली.
१६ आणि १९ वर्षाखालील गटातील क्रिकेट खेळताना त्याने वयचोरी केल्याचे उघड झाले. १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणा-या कालराने मंडळाकडे वयाचा दाखला दिला होता, तो खोटा असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.