नवी दिल्ली : भारतीय संघाला पुन्हा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधी तो तंदुरस्त आहे असा अहवाल देणा-या व प्रत्यक्ष सरावादरम्यान तो पूर्ण तंदुरस्त नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
भुवनेश्वर अद्याप पूर्ण तंदुरस्त नसल्याचे सिध्द झाले असून तो संघात पुनरागमन कधी करणार याबाबतही काही अंदाज मिळालेला नाही.
भुवनेश्वर कुमारला हर्निया झाला असल्याचे समोर आले आहे. यातून पूर्ण बरा होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.