सिडनी : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील तिस-या आणि अंतिम कसोटीस शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात कुठलाही बदल होणार नसल्याचे आॅस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले आहे.
Australia coach Justin Langer concedes it will be hard to change a winning team for the Domain Test series finale in Sydney despite the early forecast of a spinning SCG pitch: https://t.co/6f8Bfikqkj #AUSvNZ pic.twitter.com/qbxnIhFJRG
— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2020
तीन सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडला सुरूवातीच्या दोन्ही कसोटींत पराभव पत्करावा लागला आहे. यातील पर्थ कसोटी आॅस्ट्रेलियाने २९६ तर मेलबर्न कसोटी २४७ धावांनी जिंकली आहे.
तिसरी व अंतिम कसोटी शुक्रवारपासून खेळली जाणार असून तेव्हा मालिकेचा शेवट गोड करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल तर तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाॅईटवाॅश देण्याचा आॅस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.
आॅस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, जो बर्न्स, मार्नस लबुशेन, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, ट्रैविस हेड, टिम पेन, जेम्स पैटिंसन, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन.