पोलिसांची मार्गदर्शक तत्वे जाहीर
पुणे – शहरात दि. 14 ते 23 जुलै कालावधीत पुणे शहर पोलीस लॉकडाऊन आदेशामधील मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या वेबपोर्टलवर (www.punepolice.in) डिजिटल पास उपलब्ध करुन दिले आहेत. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांच्या अधिकारातील कार्यरत सेवा सेल सुविधांवर देखरेख करणार आहे.
यासाठी पोलिस काही संघटनेची (एमसीसीआयए/एसईपी / नॅसकॉम/ क्रेडाई/ नरेडको) मदत घेणार आहेत. या संघटनांशी समन्वय साधून पास मंजुरी प्रक्रियेस सुलभता आणली जाणार आहे. या प्रत्येक संघटनेच्या एका प्रतिनिधीस वेब पोर्टलवर प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांनुसार ई-पास संबंधित विनंत्यांना मंजुरी मिळू शकेल. सदस्या संघटना पुणे पोलीस ई-मेल आयडी कॉपी करत असोसिएशनला डेटा पाठवू शकतात.
यात मेट्रो, स्मार्ट सिटी अशा परवानगी असलेल्या प्रकल्पांच्या कर्मचाऱ्यांसाठी संबंधित प्राधिकरणाने दिलेली पत्रे वैध मानली जातील. तर, एमआयडीसीद्वारे परवानगी असलेले उद्योगांची परवानगी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्राह्य धरली जाईल.
आयटी कंपन्यांसाठी सूचना
ज्या आयटी कंपन्या कोणत्याही संघटनेच्या सदस्य नाहीत, त्या ई-पाससाठी (वेब पोर्टलवर अर्ज केल्यानंतर) ईमेल करू शकतात. त्यांचे नाव/ पदनाम / मोबाइल क्र./ टोकन नंबर आणि [email protected] वर पाठवावा लागेल.