फनगर -ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राज्य सचिव व संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.कॉ.सुधीर टोकेकर, अध्यक्ष ऍड. सुभाष लांडे, बाळासाहेब लोखंडे, यशराज शिंदे सहभागी झाले होते.
अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारसी मान्य करून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी त्वरित लागू करावी, कामगार विभाग यांनी किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार केलेली वाढ ताबडतोब सुरू करावी, पेन्शनचा कायदा निवृत्तीनंतर लागू करावा, गेल्या 24 महिन्यांची भविष्य निर्वाह निधी 8.33 टक्के कर्मचारी एचडीएफसी बॅंक यांच्याकडे कर्मचारी मधून कपात केला तो खातेवर वर्ग करण्यात यावा. महामारीच्या संकटकाळात जाहीर करण्यात आलेला मे व जूनचा प्रोत्साहन भत्ता अदा करा अशी मागणी करण्यात आली.