मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून हनी सिंग गाण्यांपासून चांगलाच दूर आहे. यामुळे हनी सिंगचे करिअर संपले असा अनेकांचा समज होता. पण त्या लोकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हनी पुन्हा एकदा नव्या स्वॅगसह परतला आहे. हनीने 3.0 ची घोषणा करून आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. लवकरच या अल्बमची गाणीही रिलीज होणार आहेत.त्याची झलक देखील हनीने आपल्या चाहत्यांना दिली आहे. हनीला पुन्हा एकदा आपल्या यो यो अंदाजात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. अनेकांनी कमेंट्स करून त्याच अंदाजात पुन्हा रॅपसाठी सज्ज व्हा असे म्हंटले आहे.
https://youtu.be/ctVlP0_7FC4
आपल्या गाण्यांपासून दूर गेलेला हनी सिंग गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या तुटलेल्या वैवाहिक नात्यामुळे चर्चेत आहे. पत्नी शालिनीसोबतच्या वादामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि आता नुकतेच त्यांच्या घटस्फोटावरही शिक्कामोर्तब झाले आहे. परस्पर संमतीने हनी सिंगने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपयेही दिल्याचे देखील समोर आले होते.परंतु हनी सिंग कमबॅक करत असल्याने पुन्हा एकदा सर्व रॅपर खुश झाल्याचे समजते.