मुंबई – अभिनेत्री नुसरत भरुचाला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन बराच काळ लोटला आहे. यादरम्यान तिने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नुसरतने आपल्या अभिनयाने दिग्दर्शकांचा विश्वास जिंकला आहे, त्यामुळे तिला कामाची कमतरता नाही.
Check out the super entertaining teaser of Bareilly Ke Bazaar- the first track from the upcoming movie Chatrapathi😍 This banger track is releasing tomorrow on Times Music’s YouTube Channel🔥 pic.twitter.com/UuV2YhEX6m
— Nushrratt Bharuccha (@Nushrratt) April 26, 2023
पण ती इतर अभिनेत्रींसारखी लाइमलाइटचा भाग राहिली नाही. मात्र काही काळापासून या नुसरतचे नाव लोकप्रिय रॅपर हनी सिंगसोबत जोडले जात आहे. यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हापासून नुसरत हनी सिंगचा हात धरताना दिसली, तेव्हापासून या दोघांमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले तेव्हा हनी सिंग पुढे गेला पण नुसरत भरुचाने मीडियाला प्रश्नांची उत्तरे दिली.
Phir kaahe ki Pardadaari 💁🏻♀️ pic.twitter.com/ajqZFltl2O
— Nushrratt Bharuccha (@Nushrratt) March 13, 2023
नुसरत म्हणाली, ‘तुला माहित आहे का माझ्या आयुष्यातील ही पहिली डेटिंग रूमर आहे. आतापर्यंत माझ्यासोबत अशा अफवा पसरवणारे कधीच आले नव्हते. शिवाय मी कधीही कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नव्हते म्हणून. या अफवा मी ऐकल्यावर खुश झाले.आता जर मला हा प्रश्न रॅपिड फायरमध्ये विचारला गेला तर मला सांगायला एक डेटिंग रूमर असेल. मला असे वाटते की लोकांकडे जास्त काम नाही म्हणून ते अफवा पसरवत असतात. यावर मला काही अडचण नाही.’