मुंबई – फरहान अख्तर हे सिनेसृष्टीला अभ्यासू व्यक्तिमत्व आहे म्हणूनच फरहानने केलेल्या प्रत्येक कृतीला काहींना काही तरी अर्थ असतोच. नुकतंच फरहानने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या पाळीव कुत्यांसोबत म्युजिक मैफिलचा आनंद घेताना दिसतोय.
हो तुम्ही वाचलं ते खर आहे. फरहान अख्तर हातात गिटार घेऊन ती व्वजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी फरहानसोबत घरातील पाळीव कुत्रे देखील आहेत. जे त्याच्या समोर बसून गाण्याचा सूर लावताना दिसत आहेत. कुत्र्यांचा हा आपलेपणा पाहण्यासारखा आहे. अगदी तोंड वर करून दोन्हीही कुत्रे फरहानसोबत सूर लावून गाताना दिसताहेत.
झोया अख्तरने या व्हिडिओवर कमेंट करत आतापर्यंतचे हे सर्वोत्कृष्ट बँड असल्याचे म्हंटले आहे. पत्नी शिवानी दांडेकराने कमेंट करत वर्ल्ड टूरची वाट पाहत असल्याचं म्हंटले आहे. याशिवाय अभिनेत्री मृणाल ठाकूर, क्रिती सेनॉन, आहाना एस कुमराह यांनीही हा व्हिडीओ अप्रतिम असलयाचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
फरहान शेवटचा मृणाल ठाकूर आणि परेश रावल यांच्या तुफान चित्रपटात दिसला होता. येत्या काही दिवसांत फरहान प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट ‘जी ले जरा’ दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट त्याची बहीण झोया अख्तर हिने लिहिला असून त्याचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होणार आहे.