Yo Yo Honey Singh Advice to Fans| प्रसिद्ध रॅपर हनी सिंग याने एकेकाळी तरुण वर्गात मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र मध्यंतरी हनी सिंग अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होता. त्याची गाणीही प्रदर्शित होणं बंद झाली होती. अनेक वर्षांनी यो यो हनी सिंगंने संगीतविश्वात पुनरागमन केले आहे. यातच आता हनी सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना ड्रग्ज न घेण्याचा सल्ला देत आहे.
मधल्या काळात दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारीही तो गेला होता. अनेक वर्ष तो यावर उपचार घेत होता, त्याला रिहॅब सेंटरमध्येही जावे लागले. आता तो पुन्हा एकदा स्टेजवर परफॉर्म करू लागला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो सर्वांना एक सल्ला देतोय . हनीने त्याच्या चाहत्यांना गांजा-चरस या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
काय म्हणाला यो यो हनी सिंग?
व्हिडिओमध्ये हनी सिंग म्हणतो की, ‘बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सगळे माझ्या लहान भावंडासारखे आहात. हे गांजा वगैरे काही फुकू नका. माझ्या आयुष्यातील ५ वर्ष वाया गेली आहेत. तुम्हाला हवी तेवढी दारू प्या, पण चरस-गांजाची नशा करू नका. मी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि अल्कोहोल घेण्यास सुरुवात केली होती.”
पुढे तो म्हणाला, “काही वेळानंतर मला समजले की मी मानसिक आणि बाइपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. मग त्यावर उपचार सुरू केले आणि यातून बरे होण्यासाठी 6-7 वर्षे लागली. आता मी या आजारातून पूर्णपणे बरा झालो आहे.” याच व्हिडिओमध्ये तो ‘मनाली ट्रान्स’ हे गाणं परफॉर्म करताना दिसला. सोशल मीडियावर हनी सिंगचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा:
हीरामंडीमध्ये खऱ्या दागिन्यांचा ‘वापर’ रिचा चढ्ढा सांगितला शूटिंगचा अनुभव