मुबई – बॉलिवूड सिंगर आणि रॅपर हनी सिंगला गँगस्टर गोल्डी ब्रारने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हनी सिंगच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची तक्रार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हनी सिंगने दिल्ली पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
हनी सिंग म्हणाला की, मी अमेरिकेत होतो तेव्हा माझ्या मॅनेजरसह मला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले. याबाबत मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून याबाबत लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबतचे सर्व माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले असल्याचे देखील यावेळी रॅपरने सांगितले.
याआधी गोल्डी यांनी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या केली होती. सध्या तो कॅनडामध्ये असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी गोल्डी ब्रारने बॉलिवूड स्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला सिद्धू मूसवालाप्रमाणे मारण्याची देण्याची धमकी देण्यात आली होती.
#WATCH | Delhi | I was in America when my manager got threat calls in which death threats were given to me. I have given a complaint to the police commissioner and he said they will probe it. I think the Special Cell will probe it. I have given all the info and evidence to them:… pic.twitter.com/8B9eEFEXan
— ANI (@ANI) June 21, 2023
गोल्डी आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करतो
मोस्ट वाँटेड गँगस्टर गोल्डी याच्यावर पंजाबच्या विविध पोलीस ठाण्यात खून, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यासह २३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 18 प्रकरणे अतिसंवेदनशील आहेत. आतापर्यंतच्या तपासात गोल्डी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे समोर आले आहे.