म्युझिक इंडस्ट्रीमध्ये दीडदशकाहून अधिक काळ सक्रिय असलेल्या रॅप सुपरस्टार यो यो हनी सिंहच्या मते, या काळात पंजाबी आणि हिंदी रॅप खूपच बदलला आहे. एका मुलाखतीत हनी सिंह म्हणाला, प्रत्येक गोष्ट ही विकासित होतच असते. मग ते संगीत असो, जीवनशैली किंवा लेखन अथवा अन्य काहीही. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्याचा स्वीकार करणे हे कधीही चांगले असते.
स्वतःमधील बदलाबाबत हनी म्हणाला, मी जेव्हा 2005 मध्ये पहिल्यांदा गाणे म्हटले होते, ते एक इंग्रजी आर ऍण्ड बी होते, जे पूर्णपणे रॅप नव्हते. त्यानंतर 2007 आणि 2008मध्ये मी पंजाबी रॅप सुरू केले. तो चंदीगढ दे नजारे नामक एक रिजनल अल्बम होता. यानंतर आता बारा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात पंजाबी आणि हिंदी रॅपमध्ये अनेक बदल घडून आले आहेत.
या बदलानुसार मी मार्गक्रमण करत आहे. परिवर्तन हे नेहमीच चांगले असते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास हनी सिंहचा नुकताच बिल्लो टू अग हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे हनी सिंहने गायक सिंहस्टासोबत कोलेबरेट केले आहे.