मुंबई – येस बॅंकेत 946 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्या प्रकरणात इझीगो वन ट्रॅव्हल्स अँड टूर्सच्या आठ कार्यालयांवर सीबीआयने छापे घातले. त्या कार्यालयांची झडती घेतली, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
या कंपनीच्या विकसक आणि संचालकांच्या घरावरही सीबीआयने अलीकडेच छापे घातले होते. अजय अजित पिटर केरकर आणि उर्शीला केरकर आणि संचालक निलू सिंग, मनिषा अम्रापूरकर, पेसी पटेल आणि कार्तिक वेंकटरमन यांना कर्जाच्या निधीचा वापर अन्य ठिकाणी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
तिकिट बुकिंग, हॉलिडे आणि हॉटेल पॅकेज, वाहतूक सुविधांसह ही कंपनी 2006मध्ये उभारण्यात आली होती. या कंपनीला 2017मध्ये 650 कोटीचे पॅकेज देण्यात आले होते. ते पुढील वर्षी एक हजार 15 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. बॅंकेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे यापुर्वी तक्रार दाखल केली होती.
सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती परवानगी मागे घेण्यात आली. कारण सीबीआय तपस करत असलेल्या कॉक्स अँड किंग्ज लिमिटेडच्या घोटाळ्याशी हा तपास संबंधित असल्याचे सीबिआयच्या निवेदनात म्हटले आहे.