येरवड्यात दोन तलवारीने रस्त्यात केक कापणाऱ्यास अटक
पुणे – येरवड्यात मुळशी पॅटर्न स्टाईलने एका गुन्हेगाराने तलवारीने केक कापल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या भाईच्या बड्डे ची क्लिप सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्यानंतर युनिट-4 च्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.
आरोपी आशिष परदेशी ( रा. शहादलबाबा दर्ग्याजवळ, येरवडा) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा दि.11 मार्च रोजी वाढदिवस होता.
त्याने दोन्ही हातात तलवारी घेत मित्रांच्या मदतीने भर रस्त्यावर मध्यरात्री येरवडा येथे केक कापला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी पोलीस हवालदार गणेश साळुंके, राकेश खुनवे, सागर घोरपडे, राजू मचे यांच्या पथकाला आरोपीचे शोध घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर या टीमने आरोपीस बुधवारी शहादल बाबा येथे तलवारीसह ताब्यात घेत त्याच्यावर आर्म ऍक्टनुसार त्याच्यावर कारवाई केली होती. आशिष हा येरवडा पोलीस स्टेशन मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे.