Cricket Facts of Year 2023 : वर्ष 2023 मध्ये क्रिकेट जगतात अनेक अनोखे पराक्रम घडले आहेत. भारतासह जगभरातील क्रिकेट संघ आणि क्रिकेटपटूंनी क्रिकेट जगतात असे काही विक्रम केले आहेत, जे 2023 पूर्वी कधीही पाहिले नव्हते. चला, अशाच काही 5 रंजक क्रिकेट फॅक्ट्सबद्दल जाणून घेऊया….
1. न्यूझीलंड संघाचा एका धावेने ऐतिहासिक विजय…
2023 मध्ये वेलिंग्टन येथे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फॉलोऑन करूनही न्यूझीलंडने एका धावेने रोमहर्षक विजय संपादन केला. केवळ 1 धावांनी कसोटी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉलोऑननंतर कसोटी जिंकणारा न्यूझीलंड संघ केवळ चौथा संघ ठरला. यापूर्वी 1993 मध्ये अॅडलेडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 1 धावाने पराभव केला होता.
कसोटी क्रिकेट : सर्वात लहान फरकाने विजय (धावांनी)
1. न्यूझीलंडचा इंग्लंडवर 1 धावांनी विजय, वेलिंग्टन, 2023
2. वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर 1 धावांनी विजय, अॅडलेड, 1993
3. इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 2 धावांनी विजय, बर्मिंगहॅम, 2005
फॉलोऑन असूनही कसोटी विजय…
सिडनी, 1894 : इंग्लंड 10 धावांनी विजयी
लीड्स, 1981 : इंग्लंड 18 धावांनी विजयी
कोलकाता, 2001: भारत 171 धावांनी विजयी
वेलिंग्टन, 2023: न्यूझीलंड 1 धावाने जिंकला
2. बांगलादेशने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला
2023 मध्ये, बांगलादेश संघाने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला, जो धावांच्या बाबतीत 21 व्या शतकातील सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशापूर्वी 1934 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, 1928 मध्ये, इंग्लंड संघाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला, जो आजपर्यंतचा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.
3. दोन कर्णधारांनी एकत्र खेळला 50 वा कसोटी सामना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला. त्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता. या दोन्ही कर्णधारांचा हा 50 वा कसोटी सामना होता आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन संघांच्या कर्णधारांनी त्यांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना एकत्र खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
4. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाइम आऊटव्दारे फलंदाज बाद …
#NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच, एखाद्या खेळाडूला टाइमआउट नियमाद्वारे बाद घोषित करण्यात आले. टाइमआउट व्दारे विकेट गमावणारा श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नवा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज पुढचा चेंडू 120 सेकंद न खेळल्याने त्याला बाद करण्याचे आवाहन केले आणि पंचाने मॅथ्यूजला बाद घोषित केले.
#AUSvPAK Test Series : अखेरच्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ धडाकेबाज सलामावीर होणार निवृत्त…
5. विराट कोहलीने झळकावले एकदिवसीय क्रिकेटमधील 50 वे शतक
2023 मध्ये, विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके करणारा विक्रम मोडून 50 एकदिवसीय शतके करणारा तो जागतिक फलंदाज बनला. विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वनडेतील 50 वे शतक झळकावले.