Ayodhya Ram Mandir – अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम जोरात सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2024 ला मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत. या दिमाखदार सोहळ्यासाठी देशभर तयारी सुरु आहे. लाखो नागरिक अयोध्येत एकत्र येऊन गर्दी करण्याचीदेखील शक्यता आहे.
राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम देखील पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या गर्भगहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) पहिल्या टप्प्याचे काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल, त्यानंतर मंदिर रामभक्तांसाठी खुले केले जाईल.
भव्य राम मंदिर (Ram Mandir) निर्माणकार्य सध्या प्रगती पथावर आहे. राम मंदिरामध्ये एकूण 42 दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील सोन्याच्या दरवाज्यावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचे नक्षीकाम करण्यात येत आहे. तसेच, इतर लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम केले आहे.
राम मंदिर 1000 वर्षांहून अधिक काळ तग धरून राहावे यासाठी, मंदिर निर्माणाच्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागात संगमरवरी दगड बसवण्यात आले असून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. या दगडांच्या मधे खास विटांचा वापर करण्यात आला आहे, यामुळे मंदिराच्या आतील तापमान कमी ठेवण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, राम मंदिरातील तळमजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंदिराच्या तळमजल्यावरील 14 दरवाजे महाराष्ट्रातील विदर्भातून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवले गेले आहेत. त्यावर तांब्याचा लेप करण्यात आला आहे. त्यांना सोन्याचा मुलामा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे 14 दरवाजे हैदराबाद येथील कंपनीचे कन्याकुमारी, तामिळनाडू येथील कामगार तयार करत आहेत.
या दरवाजांचे सौंदर्य आणि वैशिष्ट्ये म्हणजे, सोन्याने जडवलेले आणि सुंदर कोरीव डिझाइन असेल. आता दरवाजांचे काम अंतिम टप्प्यात आहे आहे. दिल्लीत या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक गज (हत्ती), सुंदर विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. हे दरवाजे एकमेकांपासून भिन्न डिझाइनचे असून त्यांची रचना एलएनटी कंपनीने केली आहे.