dunki movie : आजकाल सिनेमागृहात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे शाहरुख खान…. (shah rukh khan) आधी ‘पठाण’, नंतर ‘जवान’ आणि आता ‘डंकी’ (dunki) मधून किंग खानने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अलीकडेच शाहरुख खान (shah rukh khan) मन्नतच्या टेरेसवर आला आणि त्याने चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा एक इमिग्रेशन ड्रामा आहे, ज्यात अवैधपणे परदेशात जाणाऱ्या लोकांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर भावना, रोमान्स आणि कॉमेडीसह अनेक अंगांनी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आता राष्ट्रपती भवनात (rashtrapati bhavan) ‘डंकी’चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती भवनात (rashtrapati bhavan) चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंग झाले आहे, ज्यात ‘काश्मीर फाइल्स’चा समावेश आहे. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांच्या कर्मचार्यांसाठी कल्चरल सेंटरमध्ये चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये शाहरुख खान देखील सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली होती, पण 24 डिसेंबरच्या संध्याकाळी शाहरुख खान त्याच्या मन्नत या बंगल्याच्या टेरेसवरून चाहत्यांना भेटताना दिसला. त्यानंतर या खास सोहळ्यासाठी तो दिल्लीला पोहोचला नसल्याचे स्पष्ट झाले.
4 वर्षांनंतर पुनरागमन करत शाहरुख खानने यावर्षी सर्व मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता ‘डंकी’ही चाहत्यांमध्ये क्रेझ होत आहे. 30 कोटींपासून सुरू झालेल्या ‘डंकी’च्या कमाईत तिसर्या दिवशी मोठी झेप घेतली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ 20 कोटींचा व्यवसाय केला होता, तर तिसऱ्या दिवशी 25 कोटींचा व्यवसाय केला आहे.