Mahesh Gaikwad health Update । शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते.
तब्बल 24 दिवसानंतर आज महेश गायकवाड यांना घरी सोडण्यात आले आहे.उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण १० गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या.
दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड यांना टेंभी नाका या ठिकाणी जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आनंद दिघे हे माझे प्रेरणा स्थान आहेत असंही ते म्हणाले आहे. महेश गायकवाड जेव्हा कल्याणमध्ये परतले तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. तसंच जोरदार शक्तिप्रदर्शनही यावेळी करण्यात आलं. त्यानंतर महेश गायकवाड यांनी एक छोटं भाषण करत आपल्या भावनांना वाट करुन दिली.
महेश गायकवाड नेमकं काय म्हणाले
ते पुढे म्हणाले, ‘तो माझ्या कपाळावर हात फिरवून मला सांगत होता, काळजी करु नको मी आलोय. मी बोललो, साहेब तुम्ही आल्यामुळे माझ्यात एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉ. श्रीकांत शिंदे. मला त्यावेळी कळलं की जेव्हा एका कार्यकर्त्यावर अशाप्रकारचं संकट येतं तेव्हा आपला नेता आपल्याजवळ असणं किती गरजेचं आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
हेही वाचा
महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव म्हणाले,’श्रीकांत शिंदे माझ्या कपाळावरुन…”