Yami Gautam : अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. यामीने तिच्या सर्वच चित्रपटांमधील अभिनयातून प्रेक्षांकाच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यामीने 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली अशात चाहते जोडप्याच्या गुड न्यूजची चर्चा सोशल मीडियावर करत आहे.
View this post on Instagram
यामी गौतम आणि आदित्य धर नुकतेच मुंबईत स्पॉट झाले. यावेळी ती गुलाबी रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये दिसली. पांढऱ्या कुर्ता पायजमावर निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट घातलेला आदित्य धर आकर्षक दिसत होता. या फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे यामीच्या दुपट्टा कॅरी करण्याच्या स्टाइलने. अभिनेत्रीचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी यामी प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आणि तिने तिचा बेबी बंप दुपट्ट्याने लपवला होता. असाही अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. सोशल मीडियावर यामी प्रेग्नंट असल्याची अटकळ बांधली जात आहे.
यामी गौतमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने आयुष्मान खुरानासोबत विकी डोनर या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्रीचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘OMG 2’ होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात यामीने वकिलाची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये, त्याचे लॉस्ट आणि चोर निकल के भागा OTT वर प्रदर्शित झाले. दरम्यान, यामी गौतम प्रिया मणीसोबत आर्टिकल ३७० या शोमध्ये दिसणार आहे.