या भेटीमागे दडलेय काय ? मुंबईत सोनू सूद – शरद पवार यांच्यात भेट 

मुंबई – अभिनेता सोनू सूद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार , गेल्या अर्ध्या तासांपासून यांच्यात  चर्चा चालू असल्याचे समजते आहे. सोनू सूद  अचानक पवारांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, सोनू सूद विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. सोनू सूद  याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल्यामुळे ही नोटीस देण्यात आली होती. याच विषयी चर्चा  केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 


तत्पूर्वी, पालिकेने  सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली होती. बांधकामाबाबत नोटीस देऊन सुद्धा सोनू सूदने बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली आहे. पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद (Sonu Sood) कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.