रोम : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने रोम रँकिंग सीरिज कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत २०२० वर्षाची सुरूवात धडाक्यात केली आहे.
Vinesh (IND) wins her third Gold at a ranking series event. | #tokyowrestle2020 #wrestlerome #wrestling #womenswrestling pic.twitter.com/oNc6nOgJLq
— United World Wrestling (@wrestling) January 17, 2020
स्पर्धेच्या ५३ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात विनेश फोगटने इक्वाडोरच्या लुइसा एलिझाबेथ व्हाल्वेर्डेवर ४-० अशी मात करत विजय मिळविला.
Wrestler Vinesh Phogat wins gold medal at Rome Ranking Series event. #WRESTLING
— Press Trust of India (@PTI_News) January 17, 2020
दरम्यान, याआधी विनेशने चीनच्या कियानयु पांग हिचा ४-२ ने पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी विनेश हिने पहिल्या फेरीत युक्रेनच्या क्रिस्टिना बेरेजा हिचा १०-० ने आणि क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या लैनुआन लुशो हिचा १५-५ ने पराभव केला होता.