रोप : भारताची महिला कुस्तीपटू अशूं मलिकने रोम रँकिंग सीरिज स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. स्पर्धेच्या ५७ किलो गटात नायजेरियाच्या ओडूनायो अदिक्युरोयने अशूंवर मात केली आणि सुवर्णपदक पटकावलं.
Teenager Anshu Malik settled for a silver medal after losing the 57kg final
Divya Kakran missed out on a podium finish after losing her bronze play-off#RomeRankingSeries #Wrestling #AnshuMalik #DivyaKakran pic.twitter.com/ZEbsVWyx03
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 17, 2020
दरम्यान, १८ वर्षीय अशूंने उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जेना रोस बुरकर्टचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
तर दुसरीकडे भारताच्या सोनम मलिकला ६२ किलो वजनी गटात पहिल्याच फेरीत पराभव पत्कारावा लागला. अमेरिकेच्या मासे एलेन किल्टीने तिचा पराभव केला.
दिव्या काकरनला ६८ किलो वजनी गटात उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या फेंग जोऊ कडून पराभव स्विकारावा लागला. तर किरणला ७६ किलो वजनी गटात प्री क्वार्टरफायनलमध्ये एस्तोनबाच्या एप्प माईकडून पराभूत व्हावे लागले.