मिळकत कर माफ करून उलट महापालिकेनेच वार्षिक पंधरा हजार रुपये भरपाई द्यावी
ससाणेनगर – सय्यदनगर व हांडेवाडी रस्ता परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांची मागणी
हडपसर – ओला-सुका दुष्काळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईची मागणी शेतकरी सरकारकडे झालेल्या परिस्थीतीनुसार करत असल्याचे आपण नेहमीच पाहिले आहे, मात्र गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या हडपसर मधील नागरिकांनी आता या भागाला वाहतूक कोंडी ग्रस्त जाहीर करून महा पालिकेकडे हजारो रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. येथील फोष संस्थेने आज ससाणेनगर रेल्वेगेटवर त्यासाठी आंदोलनही केले आहे.
हांडेवाडी, महंमदवाडी, काळेपडळ, ससाणेनगर व हडपसर येथील त्रस्त नागरिक रोज तासंतास वाहतुक कोंडीत पडलेले असतात कधी तासभर तर कधी दोन दोन तास रस्त्यावर अडकून राहिल्यामुळे येथील समस्या ग्रस्त सर्व नागरिकांचे शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान होत आहे .
मागील कित्येक वर्षापासुन ससानेनगर रेल्वेक्रॉसिंग येथे उद्धघाटन होऊन सुद्धा उड्डाणपुल किंवा भुयारी मार्ग करण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. यांचे नेमके कारण लेखी स्वरुपात द्यावे आणि तो कधी पर्यत पूर्ण करणार ते सांगावे. अशी मागणी यावेळी फोषचे वैभव माने यांनी केली आहे. आतापर्यत या प्रोजेक्टवर महापलिकेचा पैसा वाया गेला आहे का. हांडेवाडी रोड आणि मोहम्मदवाडी रोड महापालिका शासकीय मानियतेनुसार कधी रुंदीकरण करणार आहात. मागील कित्येक महिण्यापासून होवू घातेलेल दोन सब वे रवि पार्क आणि ससाणे स्कूल येथील कधी पूर्ण करणार आहातय येवढा उशीर होण्याची कारणं काय. या दोन सब वे पूर्ण होण्यासाठी येजा कऱणारे रस्त्याचीं जागा महापालिकेला हस्तातरीत झाली आहे का. या दोन्ही सब वे ला रीटेशन भिंत बाधण्याचे काय व कसे नियोजन आहे. या मागणी करुन आज रेल्वे गेट येथे फोष संस्थेने शोले स्टाईलने आंदोलन केले.
आतापर्यत होत असलेल्या या अडचणीमुळे ससाणेनगर व काळेपडळ रेल्वे क्रॅसिंगच्या आसपास 3 किलोमीटरमधील नागरिकांना रेल्वे क्रॅसिग वाहतूक समस्या ग्रस्त घोषित करावे. त्यांना वार्षिक 15 हजार प्रति कुटुब महापालिकेच्यावतीने शासकीय मदत जाहीर करावी. ती 2013-14 पासून देण्यात यावी. याबाबत लेखी उत्तर फोष संस्थेने मागीतले आहे.
ससाणेनगर व काळेपडळ रेल्वे क्रॅसिंगच्या आसपासच्या 3 किलोमीटर मधील राहणा-या नागरिकांना मालमत्ता कर व इतर महापालिकेच्या करापासून 100 टक्के सूट द्यावी. अशी मागणी ही आंदोलन कर्त्यार्नी केली आहे.
मोर्चास समर्थनासाठी आमदार चेतन तुपे , नगरसेवक योगेश ससाणे,माजी फारुख इनामदार उपस्थित होते. सय्यद नगर येथील अंडर ग्राउंड पास जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत तीन किलो मिटर परिसरातील नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग वाहतूक ग्रस्त म्हणून घोषित करावे व प्रती घर व प्रती फ्लॅट १५००० रू वार्षिक योगदान म्हणून पुणे महानगरपालिकेने द्यावे. अशी मागणी कऱण्यात आली आहे.
यावेळी 15 मार्च पयर्त भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांनी यावेळी दिले.