सराव स्पर्धेतून पुनियाची माघार

नवी दिल्ली  -भारताचा ऑलिम्पिक पात्र कुस्तीपटू दीपक पुनिया याने दुखापतीमुळे पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. करोनाच्या धोक्‍यानंतर गेल्या वर्षानंतर ही स्पर्धा होणार असल्याने जगभरातील खेळाडू ऑलिम्पिकच्या दृष्टीने या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

पुनियाला सराव करताना कोपराला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघातील खेळाडूंवरच जबाबदारी वाढली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आठ भारतीय कुस्तीपटूंपैकी पुनिया एक आहे. दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला एक आठवडा आवश्‍यक असल्याने तो या सराव स्पर्धेला मुकणार आहे. या स्पर्धेत पुनियाचा सामना अमेरिकेच्या झैद व्हॅलेंसियाशी होणार होती, पण पुनियाने माघार घेतल्याने व्हॅलेंसियाला पुढे चाल देण्यात आली आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी सराव मिळावा म्हणून भारताने या स्पर्धेत चार खेळाडूंना संधी दिली होती. पुनियाच्या माघारीमुळे आता रवी दहिया (61 किलो), विनेश फोगट (53 किलो) आणि अंशू मलिक (57 किलो) यांच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे.

दहियाची लढत नुरीस्लाम सानायेव्ह याच्याशी होईल. विनेशची लढत 11 जून रोजी होणार आहे. मात्र, सध्या बुडापेस्ट येथे सराव करणारी विनेश अद्याप पोलंडमध्ये दाखल झालेली नाही. अंशूला ओडुनायो अदेकुरोयो हिच्याशी सामना करावा लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.