भोर, (प्रतिनिधी) – राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक या महाविद्यालयामध्ये अनंत निर्मल टेक उत्सव २०२४ या तंत्र उत्सव अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प बनविणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी स्वयंचलित कोळपे, टाकाऊ पासून टिकाऊ इलेक्ट्रिक गाडी, विविध प्रकारचे मॉडेल्स, स्वयंचलित हायड्रोलिक ड्रिल मशीन, वातानुकूलित पॉलिहाऊस, घरासाठी सुरक्षितता प्रकल्प, सायबर सिक्युरिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर प्रकल्प बनविले होते.
विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण शैलेश पाटील, प्राचार्य विशाल उबाळे, प्रा.योगेंद्र बच्चाव, प्रा. स्वानंद पासलकर, भगवंत सोनवणे, बोऱ्हाडे यांनी केले. या प्रसंगी दिलीप सिंग, शुभांगी शिंदे, विशाल गोसावी, प्राचार्य डॉ. संजय पाटील, इस्टेट मॅनेजर राहुल खामकर,
प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे, सागर उपाध्ये, अभिजीत साळुंखे, सागर निगडे, प्रीती जगताप, प्रा. अभिजीत साळुंखे उपस्थित होते. या तंत्र उत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६० संघ आणि सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.हेमंत खंडाळे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : यांत्रिकी विभाग प्रथम-येडवे ऋतिक, तिकोणकर विराज, शिंदे ईश्वरी (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी) द्वितीय-रंजीत कुमार, रितेश कुमार, विवेक रंजन सिंग, अमित कुमार (नवसह्याद्री इन्स्टिट्यूट) तृतीय- काळे महेश, कुमकर योगेश, सावंत अवधूत (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी) स्थापत्य अभियांत्रिकी प्रथम-हर्षद वेदपाठक,ओम अगलेकर, रोहित कांबळे,
धैर्यशील गायकवाड (जेएसपीएम इन्स्टिट्यूट हडपसर) द्वितीय-सिद्धी लोहार, क्षितिजा पोमण, समर्थ भिंताडे,मानसी शिंदे, प्रतिभा गिरी (नवसह्याद्री इन्स्टिट्यूट) तृतीय-व्यंकटेश इंगलवाड, रुद्रा बिनवाई, अबोली जाधव, ऋतुजा रुपनवर(जेएसपीएम इन्स्टिट्यूट हडपसर) संगणक विभाग-प्रथम-वैष्णवी घोणे, आकांक्षा मुजुमले,पल्लवी तळेकर, सानिका तळेकर (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी) द्वितीय- समृद्धी वरखडे,श्रेया गायकवाड,
अर्णव देशपांडे,आदित्य नायडू (जेएसपीएम इन्स्टिट्यूट हडपसर) तृतीय-जान्हवी साळुंखे, वैष्णवी पाटील, सानिका ताटे, तृप्ती सणस (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी) इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार विभाग- प्रथम-शेडगे ऋतुजा,धायगुडे प्रगती,खोमणे प्राजक्ता,
भाटे वैष्णवी( राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी) द्वितीय-बोडरे वैष्णवी ,साळुंखे प्रतीक्षा,कांबळे संगीता,देशमुख पूजा( राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी)तृतीय-अश्विनी कचरे,राहुल कुमार,सोनू कुमार ,जवला कुमार (नवसह्याद्री इन्स्टिट्यूट).