WPL Live Cricket Score, MI vs RCB Women’s Premier League 2024 :महिला प्रीमियर लीग 2024 च्या 19 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. मुंबईने 114 धावांचे लक्ष्य दिले होते, जे बेंगळुरूच्या संघानं 15 षटकांत गाठले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह स्मृती मानधनाचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, या पराभवामुळे मुंबईला आता पहिले स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र होण्याची शक्यता फारच कमी आहे.
दिल्लीला गुजरातशी सामना खेळायचा आहे. दिल्लीचा मोठा पराभव त्याला पहिल्या स्थानावरून दूर करेल. मुंबईने साखळी फेरीतील सर्व आठ सामने खेळले असून त्यांचे 10 गुण आहेत. त्याचवेळी दिल्लीचे सात सामन्यांनंतर 10 गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठ सामन्यांतून आठ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरले. यासह यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स बाहेर झाले आहेत. यूपीचे सहा तर गुजरातचे चार गुण आहेत. अव्वल क्रमांकाचा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दुस-या आणि तिस-या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर सामना खेळतील.
Must Win Game ✅@RCBTweets become the third & final team to qualify for the #TATAWPL Play-offs 😍 👏#MIvRCB pic.twitter.com/wWkrptdQab
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संपूर्ण संघ 19 षटकांत 113 धावांत गारद झाला. एलिस पेरीने घातक गोलंदाजी करत सहा गडी बाद केले. बेंगळुरूने 15 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. एलिस पेरी 40 धावांवर नाबाद राहिली आणि रिचा घोष 36 धावांवर नाबाद राहिली.
बंगळुरूने 39 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. संघाला 22 धावांवर पहिला धक्का बसला. सोफी मोलिनू नऊ धावा करून बाद झाली. तिला हेली मॅथ्यूजने बाद केले. यानंतर नेट सीवरने कर्णधार स्मृती मंधानाला यष्टिरक्षक प्रियांकाकडे झेलबाद केले. तिला 11 धावा करता आल्या. त्यानंतर सोफी डिव्हाईनला शबनीम इस्माईलने क्लीन बोल्ड केले. तिला चार धावा करता आल्या.
An All Round Performance 👌@ellyseperry guides @RCBTweets to the playoffs with a 4️⃣ 🙌
Scorecard 💻📱https://t.co/6mYcRQlhHH#TATAWPL | #MIvRCB pic.twitter.com/o4UDT87rQt
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ॲलिस पेरीचा कहर पाहायला मिळाला. एलिस पेरीच्या कहरातून मुंबईचा संघ सावरू शकला नाही आणि मुंबई इंडियन्सचा डाव 19 षटकांत 113 धावांवर आटोपला. पेरीने सहा विकेट घेतल्या. तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तिने 15 धावांत सहा विकेट घेतल्या.
पहिल्या षटकात तिला एकही विकेट घेता आली नाही. म्हणजेच तिने शेवटच्या 18 चेंडूत सहा विकेट घेतल्या. पेरीने आपल्या दुसऱ्याच षटकात सजना (30) आणि हरमनप्रीत (0) यांना बाद केले. त्यानंतर तिच्या दुसऱ्याच षटकात अमेलिया कर (2) आणि अमनजोत कौर (4) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या षटकात पेरीने पूजा वस्त्राकर (6) आणि नॅट सीव्हर ब्रंट (10) यांना बाद केले. पेरीने मुंबईच्या पहिल्या सातपैकी सहा विकेट घेतल्या.
मुंबईला पहिला धक्का 43 धावांवर बसला. सोफी डेव्हाईनने हेली मॅथ्यूजला पेरीकरवी झेलबाद केले. तिला 26 धावा करता आल्या. यानंतर पेरीने झटपट विकेट घेतल्या. शोभनाने हुमैरा काझीला (4) तर श्रेयंका पाटीलने शबनीम इस्माईलला (8) बाद केले. मोलिनक्सने सायका इशाकला (1) बाद करत मुंबईचा डाव 113 धावांवर आटोपला. बंगळुरूकडून गोलंदाजीत पेरीने सहा विकेट घेतल्या. तर मॉलिनेक्स, डिव्हाईन, शोभना आणि श्रेयंकाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.