WPL Live Cricket Score, MI vs RCB Women’s Premier League 2024 : आज, महिला प्रीमियर लीग 2024 च्या 19 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सुरू आहे. हरमनप्रीत कौरच्या मुंबई संघाचे लक्ष अव्वल स्थानावर आहे, तर बंगळुरूचे लक्ष अव्वल तीन स्थानावर असेल. अव्वल तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मुंबई आणि दिल्ली आधीच पात्र ठरले आहेत. तिसऱ्या स्थानासाठी बेंगळुरू आणि यूपी यांच्यात स्पर्धा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ॲलिस पेरीचा कहर पाहायला मिळाला. एलिस पेरीच्या कहरातून मुंबईचा संघ सावरू शकला नाही आणि मुंबई इंडियन्सचा डाव 19 षटकांत 113 धावांवर आटोपला. त्यामुळे बंगळुरूला विजयासाठी 114 धावांचे आव्हान मिळाले आहे. पेरीने सहा विकेट घेतल्या. तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तिने 15 धावांत सहा विकेट घेतल्या.
End of Innings!!@EllysePerry‘s gigantic bowling performance restricts #MI to 113 👌👌
Will @RCBTweets become the third team to qualify for the #TATAWPL playoffs? 🤔#MIvRCB pic.twitter.com/x1kz4BE5RS
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
पहिल्या षटकात तिला एकही विकेट घेता आली नाही. म्हणजेच तिने शेवटच्या 18 चेंडूत सहा विकेट घेतल्या. पेरीने आपल्या दुसऱ्याच षटकात सजना (30) आणि हरमनप्रीत (0) यांना बाद केले. त्यानंतर तिच्या दुसऱ्याच षटकात अमेलिया कर (2) आणि अमनजोत कौर (4) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या षटकात पेरीने पूजा वस्त्राकर (6) आणि नॅट सीव्हर ब्रंट (10) यांना बाद केले. पेरीने मुंबईच्या पहिल्या सातपैकी सहा विकेट घेतल्या.
मुंबईला पहिला धक्का 43 धावांवर बसला. सोफी डेव्हाईनने हेली मॅथ्यूजला पेरीकरवी झेलबाद केले. तिला 26 धावा करता आल्या. यानंतर पेरीने झटपट विकेट घेतल्या. शोभनाने हुमैरा काझीला (4) तर श्रेयंका पाटीलने शबनीम इस्माईलला (8) बाद केले. मोलिनक्सने सायका इशाकला (1) बाद करत मुंबईचा डाव 113 धावांवर आटोपला. बंगळुरूकडून गोलंदाजीत पेरीने सहा विकेट घेतल्या. तर मॉलिनेक्स, डिव्हाईन, शोभना आणि श्रेयंकाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
दरम्यान, आरसीबी संघाने हा सामना जिंकल्यास अव्वल तीनमधील त्यांचे स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, ते हरले तर त्यांना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या सामन्यावर निर्भर रहावं लागू शकते. मग एकतर निव्वळ रन रेट किंवा गुणांच्या फरकाने, कोणताही संघ पहिल्या तीनमध्ये प्रवेश करू शकतो. दिल्ली कॅपिटल्ससह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानासाठीच्या लढाईत मुंबई इंडियन्सची स्थिती सारखीच आहे.