Tourist places । जगातील असे काही पर्यटन स्थळे आहेत ज्याठिकाणी आपण नेहमी जाण्याचा विचार करतो. काही ठिकाणी जाणे आपले शक्य होते पण जगात अशा पर्यटन स्थळांचा समावेश आहे जे अत्यंत रमणीय आहेत. त्यातील काही पयर्टन स्थळे पुढील प्रमाणे….
कुक आयलँड – हा 15 बेटांचा समूह प्रशांत महासागरात दक्षिणेला आहे. अतिशय सुंदर आणि रमणीय असा हा परिसर आहे. यातील रारोटोंगा हे बेट क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे. अव्हारूहा ही या बेटांची राजधानी इथेच आहे. इथूनच अन्य बेटांवर जाता येते. या बेटांवर स्नॉर्केलिंग, फिशिंग, डायव्हिंग अशा ऍक्टिव्हिटी करता येतात. माओरी ही येथील मूळची जमात आहे त्यामुळे येथील संस्कृतीला माओरी संस्कृती म्हणून ओळखता जाते. न्यूझींलडच्या ईशान्येला हा द्वीप समूह आहे.
नॉर्वे – नॉर्वे हा पृथ्वीच्या पाठीवरील आनंदी देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. युवराज हकोन आणि युवराज्ञी मेटमॅरिट यांचे निसर्गावर अतिशय प्रेम असल्याने येथील निसर्ग जपण्यासाठी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. फॉरेस्ट बाथ ही संकल्पना या देशात अनुभवली जाते. म्हणजेच लोक जंगलात फिरायला जातात. बोकेकोजिन हे इथले बीचवरील जंगल आहे. राजधानी ओस्लो पासून दोन तासाच्या अंतरावर हे जंगल आहे. त्यामुळे तुम्ही शहरातील जीवन आणि जंगलातील जीवन एकाच दिवशी अनुभवू शकता.
मॉरीशस – हिंदी महासागरात मादागास्करच्या पूर्वेला मॉरिशस आहे. आफ्रिकेचे प्रवेशद्वार म्हणूनही मॉरिशसची ओळख आहे. या ठिकाणी रमणीय अशी गोल्फ कोर्सेस माऊंटन ट्रेनिंग आणि विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स, बर्ड वॉचिंग, रमणीय समुद्रकिनारे बोटॅनिकल गार्डन्स असा पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. मॉरिशस मध्ये ब्रिटिशांची जुनी वसाहतही आहे. त्या ठिकाणची टुमदार घरे आणि इमारती तसेच लज्जतदार पदार्थ, नाईटलाइफ याचा अनुभव घेता येतो. युनोस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केले आहे.
बेलीज – कॅरेबियन समुद्रात हे टुमदार पर्यटन स्थळ आहे. उत्तर अमेरिकेतील शहरांपासून तर अतिशय जवळ असून तिथून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. बेलीजचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात केला आहे. या ठिकाणच्या समुद्रात असलेली प्रवाळे अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी आहेत.
स्लोव्हेनिया – पूर्व युरोपातील या देशांमध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षणाची ठिकाणे आहेत. मुख्य म्हणजे मिशेलिन गाईडने स्लोवानियन रेस्टॉरंटला सात स्टार्सचा दर्जा दिलेला आहे. स्लोव्हानियातील ब्लेड तलाव हा रमणीय आणि सुंदर असा आहे.
अँग्यूला – हा तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या देश नसून ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश आहे. कॅरिबियन समुद्रातील बेट स्वरूपातील हा प्रदेश पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. या ठिकाणी पर्यटकांचे आदरातिथ्य अतिशय सरबराईने केले जाते. या ठिकाणी जवळपास 33 सार्वजनिक समुद्रकिनारे आहेत. त्यामध्ये स्फटिक सारखे पाणी असलेले रमणीय किनारे, सुंदर हॉटेल्स, लज्जतदार पदार्थ यांची रेलचेल असते.
नेपाळ – माऊंट एव्हरेस्ट साठी जगभरात नेपाळ प्रसिद्ध आहे. नेपाळ हे पर्यटकांसाठी अनेक अर्थाने आकर्षणाचा विषय आहे. ट्रेकर्स, माऊंटेनियर्स नेपाळमध्ये मोठ्या संख्येने नेहमीच येत असतात. त्याखेरीज धार्मिक स्थळे, नद्या आणि डोंगरांचा रमणीय परिसर यामुळे पर्यटक या ठिकाणी रमतात. आता या ठिकाणी स्थानिक घरात होमस्टेची व्यवस्था सुरू झालेली आहे. याक बटर आणि मोमोज हे येथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहेत.
मलावी – शेजारील मोझांबिक आणि टांझानियाच्या तुलनेत मलावी हा छोटासा देश आहे. त्याला वॉर्म हार्ट ऑफ आफ्रिका असेही म्हटले जाते. मलावी मधील अभयारण्य पाहण्यासारखे आहे. त्या ठिकाणी हत्ती, बबून, हिप्पो आणि अन्य विविध प्राणी पाहायला मिळतात. त्यासाठी वाईल्ड सफारींची सुविधा करण्यात आलेली आहे.