First Super Overs in IPL history : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली. लीगमधील पहिला सुपर ओव्हर 2009 मध्ये खेळवण्यात आली होती. आयपीएलची पहिली सुपर ओव्हर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळली गेली. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्नने सुपर ओव्हरमध्ये तरुण कामरान खानकडे ( Kamran Khan ) चेंडू सोपवून सर्वांना चकित केले. वास्तविक, त्यावेळी भारताचा मुनाफ पटेल, रवींद्र जडेजा, इंग्लंडचा दिमित्री मस्करेन्हास आणि कर्णधार शेन वॉर्न हे राजस्थान संघात होते, पण त्याने युवा कामरानवर सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी सोपवली होती.
कामरान खानने टाकली होती आयपीएलची सुपर ओव्हर
18 वर्षीय कामरान खानसमोर ( Kamran Khan ) सुपर ओव्हरमध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ख्रिस गेलसारखे जागतिक दिग्गज फलंदाज होते. अशा स्थितीत वॉर्नने आपल्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. बरं, या सामन्यात कामरानने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास बसणं स्वाभाविक होतं. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने सामन्यात चार षटकात अवघ्या 18 धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात कामरानने सौरव गांगुली, लक्ष्मी रतन शुक्ला आणि संजय बांगर यांना बाद केले होते.
जर आपण सुपर ओव्हरबद्दल बोललो तर कामरानच्या ओव्हरमध्ये एकूण 15 धावा झाल्या. ख्रिस गेलने तीन चौकार मारले होते. अशा स्थितीत राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. यावेळीही वॉर्नने युवा खेळाडूवर विश्वास ठेवला. वॉर्नने युवा युसूफ पठाणला सलामी दिली. पठाणनेही कर्णधाराला निराश केले नाही आणि आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
कामरान खान आता कुठे आहे?
गरीब कुटुंबातील कामरान खानसाठी ( Kamran Khan )आयपीएल खेळणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. कामरानने आपल्या पहिल्याच सत्रात मोठ्या खेळाडूंना बाद करून संपूर्ण जगात स्वत:चे खास नाव निर्माण केले होते. मात्र, त्यानंतर हा खेळाडू गायब झाला. कामरान आयपीएलपासून का दूर झाला हे कोणालाच माहीत नाही.
एकेकाळी कामरानला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार म्हटले जायचे. काही काळानंतर हा खेळाडू अज्ञाताचे जीवन जगू लागला. कामरान आयपीएलमध्ये केवळ 9 सामने खेळू शकला. कामरान खानने आयपीएलच्या 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. कामरानच्या बाॅलिंग अॅक्शनवर प्रश्न उपस्थित केले गेले होते, मात्र नंतर त्याला clearance क्लीयरेंस मिळालं. त्यानंतर तो पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला.
कामरानने शेवटचा सामना 2011 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. तेव्हापासून तो आयपीएलपासून दूर आहे. कामरान आयपीएलपासून का दूर राहिला हे माहीत नाही, पण सध्या तो कोणत्याही लीगमध्ये खेळत नाहीये. एकेकाळी 140 च्या वेगाने गोलंदाजी करणारा हा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक गायब झाला आहे. त्याचवेळी 2012 साली ते शेती करत असल्याचे चित्रही समोर आले होते, पण सध्या तो काय करतोय हे कोणालाच माहित नाही.