Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणूकांदरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचे विधान आपल्या भाषणादरम्यान केले होते.अशात आता भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, हेच सांगायला मी इथं आले आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर साधला आहे.
#WATCH | Telangana: BJP leader Navneet Rana campaigns for party candidate from Zaheerabad Lok Sabha constituency BB Patil in Sangareddy.
She says, “… In the last five years, I have seen BB Patil work in his constituency. BJP call for 400 paar will be fulfilled and one seat out… pic.twitter.com/mWGJtE5sn0
— ANI (@ANI) May 7, 2024
दरम्यान, तेलंगणा येथील झहिराबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचार रॅलीत नवनीत राणा या एएनआयच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या,’काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, हेच सांगायला मी इथं आले आहे, असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळं राजकारण तापले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ‘गेल्या पाच वर्षात बीबी पाटील यांनी आपल्या मतदारसंघात काय काम केलंय हे मी पाहिलं आहे.भाजपनं दिलेला ४०० पारचा नारा पूर्ण होईलच या ४०० पैकी झहिराबादची एक जागा असेल. देशासाठी एकच गोष्ट गरजेची आहे की नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तसेच काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे, हाच विरोध करण्यासाठी मी आज इथं आले आहे.’
हे वाचले का ? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप