Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम शिगेला पोहोचला आहे. दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत तर आरसीबी एलिमिनेटर सामना खेळणार आहे. या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आज होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी दिल्लीने पाच जिंकले आहेत, तर दोन गमावले आहेत. त्याचबरोबर मुंबईने आठपैकी तीन सामने गमावले आहेत.
आजचा सामना दिल्लीसाठी महत्त्वाचा…
या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाची फायनलमध्ये प्रवेश करण्यावर नजर असेल. जर संघ जिंकला तर त्याला थेट फायनलचे तिकीट मिळेल. त्याचवेळी दिल्लीला गुजरातकडून निसटता पराभव पत्करावा लागला तरी संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतात. खरं तर, दिल्ली कॅपिटल्स 10 गुणांसह आणि +0.918 च्या निव्वळ रनरेटसह गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. तर, समान गुण आणि +0.024 च्या निव्वळ रनरेटसह मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
प्लेऑफच्या शर्यतीतून दोन संघ बाहेर..
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. यामध्ये यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचा समावेश आहे. दोघेही गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
आज ठरणार एलिमिनेटरमधील दुसरा संघ…
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आरसीबी 15 मार्चला होणारा स्पर्धेतील एलिमिनेटर सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळणार हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. दरम्यान गेल्या मोसमातही दिल्ली थेट फायनलसाठी पात्र ठरली होती. मात्र, मुंबई इंडियन्सकडून संघाचा दारुण पराभव झाला.