मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील 70 टक्के जनता ही लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. पण याच दरम्यान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’चे काम सुरुच आहे. तो सध्याच्या घडीतही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी धावत आहे. त्यामुळेच बॉलीवुडचा हा खलनायक खऱ्याखुऱ्या आयुष्यात हिरो ठरत आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही सोनू पुढे सरसावला आहे.
नुकतंच सोशल मीडियावर आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथील टमाटा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतात नांगरणी करताना, बैलांच्याजागी आपल्या दोन मुलींना जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बैल विकत घेण्यासाठी या शेतकऱ्याकडे पैसै नसल्याने त्याने कुटुंबाच्या मदतीनेच नांगरणी केली.
This family doesn’t deserve a pair of ox 🐂..
They deserve a Tractor.
So sending you one.
By evening a tractor will be ploughing your fields 🙏
Stay blessed ❣️🇮🇳 @Karan_Gilhotra #sonalikatractors https://t.co/oWAbJIB1jD— sonu sood (@SonuSood) July 26, 2020
दरम्यान, अभिनेता सोनू सूदला यासंदर्भातील माहिती मिळताच त्याने या गरीब शेतकऱ्याला बैलजोडी घेऊन देण्याची घोषणा केली होती. मात्र, काही वेळातच सोनूने आपला निर्णय बदलला आणि या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन देण्याचं आश्वास दिल. उद्यापर्यंत या बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर पोहोचेल, असं त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. सोनू सूदचे एवढे मोठे मन पाहून अनेकांनी त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.