Sonu Sood Whstsapp Blocked| बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अभिनयासह त्याच्या सामाजिक कार्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. कोरोना काळात त्याने मोठ्या प्रमाणात गरजवंतंना मदत केली आहे. यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोनू सुदचे व्हॉट्सअॅप अकाउंट ब्लॉक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
सोनू सूदचे व्हॉट्सॲप गेल्या 36 तासांपासून सक्रिय नाही आणि अभिनेत्याने कंपनीला ते दुरुस्त करण्याचे विनंती केली आहे. सोनूने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवरून याबाबतची माहिती शेअर केली आहे. सोनूने २६ एप्रिलला पहिली एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली होती. पोस्ट शेअर करताना त्याने व्हॉट्सॲपला टॅग केलेला आहे. तो म्हणाला की, “माझा व्हॉट्सॲप नंबर काम करत नाही. मी ह्या समस्येचा अनेकदा सामना केलेला आहे. मला वाटतं की तुम्ही सेवा सुरळीत करावी.” Sonu Sood Whstsapp Blocked|
Still my account doesn’t work..
Time to wake up guys.
It’s been more than 36 hours.
Message me directly on my account asap.
Hundreds of needy people must be trying to reach for help.
Kindly do your bit . pic.twitter.com/nvtbZKKwpU— sonu sood (@SonuSood) April 27, 2024
त्यानंतर सोनूने 27 एप्रिल रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ” व्हॉट्सॲप अजूनही माझे अकाउंट काम करत नाही. मित्रांनो, आता जागं होण्याची वेळ आली आहे. 36 तासांहून अधिक काळ झालेला आहे. मला शक्य तितक्या लवकर माझ्या अकाउंटवर थेट संदेश पाठवा. हजारो गरजू लोकं मदतीसाठी मला मेसेज करण्याचा प्रयत्न करत असतील. कृपया मदत करा”, असं म्हणत सोनूने आपली निराशा व्यक्त केलेली आहे. Sonu Sood Whstsapp Blocked|
सोनूने त्याचे व्हॉट्सॲप बंद असल्याचा स्क्रिनशॉट शेअर केलेला आहे. तसेच व्हॉट्सॲपने सोनू सूदचे अकाऊंट का ब्लॉक केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे तर, सोनू सध्या ॲक्शन-थ्रिलर ‘फतेह’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘फतेह’ चित्रपटाचे कथानक सायबर क्राईमच्या भीषणतेवर भाष्य करणारा आहे. सध्या तो त्याच्या सामाजिक कामासोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठीही काम करीत आहे.
हेही वाचा:
प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ची रिलीज डेट जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज