मंचर -आंबेगाव तालुक्यामध्ये नव्याने 34 करोनाबाधित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 23 हजार 361 झाली आहे. मंचर येथे 13, कळंब, अवसरी खुर्द येथे प्रत्येकी 3, घोडेगांव येथे 2, पेठ, जारकरवाडी, पेठ पारगांव, साकोरे, खडकी पिंपळगांव, निरगुडसर, कारेगाव, काठापूर, चिंचोली, मेंगडेवाडी, महाळुंगे पडवळ, रांजणी, कोळवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित सापडले आहेत.
22 हजार 630 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यत 464 रुग्णांचा मृत्यू झाला असून 267 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सभापती संजय गवारी यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना करोना नियमांचे पालन करीत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.