World Cup 2023 IND vs ENG Match Toss Update : विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. इंग्लंड टीमनं टॉस जिंकून घेतलेला बॉलिंगचा निर्णय त्यांच्या बॉलर्सने पहिल्या पंधरा ओव्हरमध्येच सार्थ करून दाखवला. (IND vs ENG)
पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिली 10 षटके इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. त्यांनी केवळ 35 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्सने शुभमन गिलला (9) (Shubhaman Gill) क्लीन बोल्ड केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला (0) (Virat kohali) स्टोक्सकरवी झेलबाद केले.12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर १६ चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर मैदानात आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलने दमदार बॅटिंग करत भारताचा डाव सावरला. दोघांनी संयमीपणा दाखवत चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेने वाटचाल सुरु केली. तत्पूर्वी रोहित शर्माला डीआरएमद्वारे मिळालेल्या जीवनदानामुळे त्याने शानदार अर्धशतक पूर्ण केले.
काय झालं नेमकं त्यावेळी ?
16व्या षटकात रोहित शर्माला जीवदान मिळाले. या षटकात मार्क वुड गोलंदाजी करत होता. पाचवा चेंडू सरळ जाऊन रोहितच्या पॅडला लागला. त्यानंतर फील्ड अंपायर एड्रियन होल्डस्टॉकने रोहितला बाद घोषित केले. यावर रोहितने डीआरएसचा उपयोग केला.
डीआरएस रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टंप चुकत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत रोहितला जीवदान मिळाले. पुढच्याच चेंडूवर म्हणजेच १६व्या षटकात रोहितने सहाव्या चेंडूवर चौकार मारून बदला घेतला.हा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला आणि रोहितने आक्रमक फटकेबाजीला सुरुवात करत आपले अर्धशतक पूर्ण केले.