World Cup 2023 IND vs ENG Match Live Score :- आज, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माने 66 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील हा त्याचा तिसरा 50+ स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध 86, अफगाणिस्तानविरुद्ध 131, बांगलादेशविरुद्ध 48 आणि न्यूझीलंडविरुद्ध 46 धावा केल्या.
IND vs ENG Live Score : सध्या 28 षटकाचा खेळ झालेला आहे आणि भारतीय संघाने 3 गडी गमावून 118 धावा केल्या आहेत. केएल राहुल 37*(50) आणि रोहित शर्मा 66*(74) धावांसह खेळत आहे. दोघांमध्ये 78 धावांची भागीदारी झाली आहे.
जबाबदारीने फलंदाजी करत कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. आज जरी हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी हिटमॅनला अधिक चेंडू खेळावे लागले असले तरी या खेळीचे महत्त्व खूप मोठे आहे.
चौथ्या षटकात 26 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या. त्यानंतर लगेचच 27 च्या स्कोअरवर डेव्हिड विलीने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली आठ चेंडूत खाते उघडू शकला नाही आणि दबावाखाली दिसत होता. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर अन् नवव्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्नात विराट स्टोक्सला झेल देऊन बसला.
पॉवरप्लेमध्ये इंग्लंडची शानदार गोलंदाजी…
पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिली 10 षटके इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. त्यांनी केवळ 35 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्सने शुभमन गिलला (9) क्लीन बोल्ड केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला (0) स्टोक्सकरवी झेलबाद केले.
12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 16 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयसला मार्क वूडने ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. शॉर्ट बॉलवर श्रेयस पुन्हा एकदा बाद झाला. ही त्याची कमजोरी आहे आणि विश्वचषत स्पर्धेत तो या चेंडूवर अनेक वेळा बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धही तो शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्नात श्रेयस विकेट गमावून बसला.