वॉशिंग्टन – चीन आणि इतर काही सरकारांविषयी डेटा बदलण्यासाठी बॅंकेच्या नेत्यांकडून कर्मचाऱ्यांच्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले होते. जगभरातील व्यावसायिक परिस्थितीवरील हा अहवाल जागतिक बॅंकेने रद्द ठरविला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टलिना जॉर्जीवा जागतिक बॅंकेच्या अहवालात गैरव्यवहार केल्याच्या वादात अडकल्या आहेत.
चीनला खुश करण्यासाठी जागतिक बॅंकेच्या “डुइंग बिझनेस रिपोर्ट’मध्ये बदल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. जागतिक बॅंकेने हा “डुइंग बिझनेस रिपोर्ट’ 2018 ते 2020 च्या आवृत्त्यांच्या तपासात अनियमितता आढळल्यानंतर त्वरित बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बॅंकेच्या या प्रमुख अहवालात देशांना व्यापार नियम आणि आर्थिक सुधारणांच्या आधारावर स्थान देण्यात आले आहे. हा अहवाल दाखवून सरकार गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करण्यास सांगतात. मात्र चीनची या अहवालातील त्यांच्या नाराजी होती. लॉ फर्म विल्मरहेलच्या एका तपास अहवालात असे आढळून आले की बीजिंगने 2017 मध्ये त्यांच्या 78 व्या रॅंकिंगबद्दल तक्रार केली होती आणि पुढील वर्षी या रॅंकमध्ये त्यांना आणखी खाली दाखवणार होते.
ऑक्टोबर 2017 मध्ये, अहवाल येण्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात, जागतिक बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष जिम किम आणि जॉर्जीवा (तत्कालीन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चीनच्या स्कोअर बदलण्यास सांगितले होते. जणेकरून चीनचा स्कोअर अधिक चांगला दाखवता येईल. किमने चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रॅंकिंगवर चर्चा केली होती, जे रॅंकिंगवर खूश नव्हते. त्यावेळी रॅंकिंग कसे सुधारणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
त्यावेळी जागतिक बॅंकेने भांडवलासाठी चीनकडून मदत मागितली होती. त्या बदल्यात अहवालात त्याला हा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची देखील चर्चा आहे. डूइंग बिझनेस 1018′ अहवालात चीनने 7 स्थानांची झेप घेतली. त्यांच्या रॅंकिंगमध्ये ही सुधारणा डेटा मेथडॉलॉजीमध्ये बदल केल्यानंतर झाली, जी सुरुवातीच्या मसुद्याच्या अहवालापेक्षा पूर्णपणे वेगळी होती, असा आरोप होत आहे.
फेरफार झाल्याचे नाकारले
आयएमएफ प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात डेटाच्या तपासात फेरफार झाल्याचे नाकारले आहे. जागतिक बॅंकेचा हा अहवाल 2018 मध्ये त्यांच्या भूमिकेशी संबंधित आहे आणि यामुळे त्याची प्रतिमा खराब होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या दाव्याला देखील हवाला दिला, ज्यामध्ये म्हटले आहे की चीनला बहुपक्षीय संस्थेने मदत केली आहे.