नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या साथीमुळे पूर्व आशिया आणि पॅसिफिकमधील एक कोटी 10 लोक दारीद्य्र रेषेखाली ढकलले जातील, असा इशारा जागतिक बॅंकेने दिला आहे.
जागतिक बॅंकेने आपला अहवाल सोमवारी जाहीर केला. जगभरात सात लाख 80 हजार जणांना बाधा झालेला आणि 37 हजार जणांचे प्राण घेणाऱ्या या विषाणूंमुळे तीन कोटी 50 लाख जण दारीद्य्र रेषेखाली जातील असे यापुर्वीचे अनुमान होते. त्यात 2 कोटी 50 लाख जण चीनमधील असतील असे गृहीत धरले होते.
जर आर्थिक परिस्थिती बिघडली आणि कमी जणांना याची लागण झाली तर तर दारीद्य्र रेषेखाली जाणाऱ्यांचे प्रमाण एक कोटी 10 लाख असेल, असे जागतिक बॅंकेच्या एप्रिल 2020च्या अहवालात नमूद केले आहे. आंरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंक यांच्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या अहवालाला महत्व आले आहे.
या भागातील विकास दर 2.1 टक्के ते उणे 0.5 एवढा खालावेल. हा विकास दर 2019मध्ये 5.8 एवढा होता, असे त्यात म्हटले आहे.