पिंपरी- पोलीस चौकीच्या बाहेर महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. याबाबत महिलेने गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी महिलेला अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवीगाळ केली. याबाबत महिला तक्रार देण्यासाठी काळेवाडी पोलीस चौकीत आली. तक्रार देऊन चौकीबाहेर आली असता एक अज्ञात व्यक्तीने तिथे येऊन शिवीगाळ करीत पोलीस चौकीच्या समोरच महिलेला फरफटत नेऊन तिचा विनयभंग केला.