नागपूर – केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचनालय यांच्यापाठोपाठ आता प्राप्तीकर विभागही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे हात धुवून लागला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील निवासस्थानासोबतच जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 6 संस्थामवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले.
देशमुख यांच्या निवासस्थानी सकाळीच प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल. आर्थिक त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि अन्य ठिकाणी या विभागाने छापे टाकून तपास सुरू केला आहे. याआधी ईडी देखील अनिल देशमुख यांची चौकशी करत असून त्यात आता आयकर विभागाची देखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथके बाहेरून आल्याची माहिती मिळत आहे.आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील हे छअपे टाकण्यात आले. त्यांचे भागीधार काद्री आणि भटेवार यांची देखील या विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
खासगी सचिवाचं निलंबन!
दरम्यान, गुरुवारी 16 सप्टेंबर रोजी अनिल देशमुख यांचे गृहमंत्री असतानाचे खासगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं निलंबन करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना 26 जूनला अटक केल्यानंतर 6 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत होते.
त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यांचा पोलीस कोठडीतील कालावधी 48 तासांपेक्षा अधिक असल्याने 26 जूनपासून त्यांना निलंबित मानण्यात आलं आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.