पुणे : व्यावसायिकाच्या सदनिकेतून सोन्याचे दागिने आणि रोकड असा १ कोटी ७४ लाख ४० हजारांचा ऐवज नात्यातील एका महिलेने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अक्षय भंडारी (वय ३३,रा. गायत्री अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी नातेवाईक महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारी यांचा चाकण येथे व्यवसाय आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर बँकाही बंद होत्या. त्यामुळे भंडारी यांनी घरात जवळपास एक कोटी रुपयांची रोकड ठेवली होती