IPL 2024 (Live Cricket Score, LSG vs KKR) : आज आयपीएल 2024 चा 54 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. एकना स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 6 बाद 235 धावा केल्या. या मैदानावरील टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर सुनील नरेनने सर्वाधिक धावा केल्या. सुनील नरेनने 39 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार मारले.
Breached 𝟐𝟎𝟎 at Ekana in style!
Time to defend it 💪 pic.twitter.com/yjCxZ6Qvop
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 5, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. या संघाचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी झंझावाती सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी 4.2 षटकात 61 धावा जोडल्या. 14 चेंडूत 32 धावा करून फिल सॉल्ट नवीन उल हकचा बळी ठरला.
अंगकृश रघुवंशीने 26 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. तर आंद्रे रसेल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. 8 चेंडूत 12 धावा करून आंद्रे रसेलला नवीन उल हकने बाद केले. रिंकू सिंग 11 चेंडूत 16 धावा करून नवीन उल हकच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 15 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. रमणदीप सिंगने 6 चेंडूत 25 धावा करत डावाचा शानदार शेवट केला.
लखनौ सुपर जायंट्ससाठी नवीन उल हक हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नवीन उल हकने कोलकाता नाईट रायडर्सच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्याने 4 षटकात 49 धावा दिल्या. याशिवाय रवी बिश्नोई, यश ठाकूर आणि युद्धवीर सिंग चरक यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.