ग्रेनाडा : एविन लुइसच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्टइंडिजने तिस-या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ५ गडी राखून पराभव केला आहे. यासह वेस्टइंडिजने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने खिशात घालत आयर्लंडला व्हाईटवाॅश दिला आहे.
#WIvIRE WI Win!!🙌The #MenInMaroon complete their 1⃣5⃣th ODI Series Sweep! #ItsOurGame pic.twitter.com/81hTFTDKbI
— Windies Cricket (@windiescricket) January 12, 2020
वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना आयर्लंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ४९.१ षटकांत सर्वबाद २०३ धावा केल्या होत्या. आयर्लंडकडून फलंदाजीत एंड्यू बल्बराइनने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत हेल्डन वाल्शने सर्वाधिक ४, ओशेन थाॅमसने ३, राॅसटन चेजने २ तर रोमारियो शेफर्डने १ गडी बाद केला.
विजयासाठी २०४ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजने २५.५ षटकांत ३ बाद १४८ अशी मजल मारली असताना पावसामुळं खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर डकवर्ड लुईसनुसार विडींजला ४७ षटकांत १९७ धावांच सुधारित लक्ष्य देण्यात आलं. हे लक्ष्य विडींजने ३६.२ षटकांत ५ बाद १९९ धावा करत पूर्ण केलं.
वेस्टइंडिजकडून फलंदाजीत एविन लुइसने ९७ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारासह १०२ धावांची खेळी केली. तर, निकोलस पूरनने नाबाद ४३, ब्रैंडन किंगने ३८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. एविन लुइस सामन्याचा मानकरी ठरला. आयर्लंडकडून एंडी मैक ब्राइनने २ तर बैरी मैकार्थी, क्रेग यंग आणि सिमी सिंहने १ गडी बाद केला.