विविध 25 ठिकाणी लावले कॅमेरे : चोर्या दरोड्याना लागणार आळा
आळेफाटा – वाढत्या चोर्या, दरोडे यांना लगाम लागण्यासाठी आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केलेल्या आव्हानाला साथ देत आळे ग्रामपंचायतच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.त्यामुळे आळे (ता. जुन्नर) गावातील ग्रामस्थांना आता सुखाची झोप लागणार आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावास जोडणार्या लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावात विविध 25 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून कॅमर्यांचे नियंत्रण केले जाणार आहे. आळे गावात मागील काळात चोरांनी घुमाकूळ घातला होता, अनेक छोट्या-मोठ्या चोर्या तसेच वाहन चोरीचे प्रकार घडले होते. यातून गावात असुरक्षिततेचे वातावरण होते. सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच अॅड. विजय कुन्हाडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला.
गावातील बहुतांश नागरिक शेतकरी व व्यावसायिक आहेत. त्यामुळे दिवसा गावात शुकशुकाट असतो. त्यामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी नगर-कल्याण महामार्गासह लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील बाजारपेठ, सरकारी दवाखाना, शाळा, गावातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वेशीवर आदी ठिकाणी 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे गावातील चोर्या, दरोडे आणि रस्त्यावर घाण करणार्यांसह इतर गैरप्रकारांना देखील आळा बसण्यासाठी 25 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून कॅमेर्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.
त्यावरही राहणार नजर
शासकीय कर्मचारी कधी येतात, कधी जातात यावरही ग्रामपंचायतीची नजर असेल, सोबतच आळे गाव पंचक्रोशीत चर्चचा विषय बनला आहे. आता आसपासची गावेही आपले गाव असेच बनवण्याची योजना तयार करत आहेत. अनेकवेळा आळे गावात सीसीटीव्ही नसल्याने पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता. सीसीटीव्ही कॅमेरे गावात बसवण्याची मागणी अनेक दिवसांची होती. गावातील लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. चोर्यांचे वाढते प्रमाण आणि वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. रस्त्यावरील अपघात आणि वाहन चोर्या यांवर आता नजर ठेवता येणार आहे.