राजकोट : सौराष्ट्राच्या चेतेश्वर पूजाराने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकाविरूध्द खेळताना रविवारी पहिल्या डावात ३९० चेंडूत २४ चौकार व १ षटकारासह २४८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सौराष्ट्राने पहिला डाव ७ बाद ५८१ वर घोषित केला.
50 First Class Hundreds ✅
7 Double Hundreds in #RanjiTrophy ✅There's no stopping @cheteshwar1! 👏👏
Follow his progress against Karnataka 👇👇https://t.co/OVSHnhUpMM #SAUvKAR @paytm pic.twitter.com/woAGGK1yNk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
दरम्यान, पूजाराच्या २४८ धावांची खेळीमुळे त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले आहेत. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पूजारा देशाचा पहिलाच फलंदाज ठरला. पूजाराने माजी कसोटीपटू विजय मर्चंट यांची कामगिरी मागे टाकली. मर्चंट यांनी ११ व्दिशतके नोंदविली आहेत.
पूजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३ वे व्दिशतक ठरले.
रणजी स्पर्धेतील हे पुजाराचे ७ वे व्दिशतक ठरले. अशी कामगिरी करणारा तो तिसराच फलंदाज ठरला. याआधी अजय शर्मा आणि पारस डोग्रा यांनी ही कामगिरी केली आहे.
-प्रथम श्रेणीमध्ये (१९८ लढतीत) वेगाने १३ व्दिशतके पूर्ण करणा-या फलंदाजामध्ये पुजाराने तिसरा क्रमांक पटकावला.
– कर्नाटकविरूध्द दोन व्दिशतके ठोकणारा पुजारा हा दुसराच खेळाडू आहे.
– पूजाराने रणजी स्पर्धेत १०४ डावांत ६,००० धावाही पूर्ण केल्या. हा टप्पा वेगाने गाठणारा तो चौथा फलंदाज ठरला.