बारामती – “भिलवाडा’ तसेच “बारामती पॅटर्न’मुळे शहरातील करोना परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. गेल्या सहा दिवसांत करोनाचा संक्रमित रुग्ण आढळलेला नाही.
शहरातील जवळपास 1 लाख 20 हजार नागरिकांचे आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. बारामतीकरांसाठी ही बाब दिलासादायक असली, तरी देखील करोनाचे संकट अद्याप दूर झाले नाही. त्यामुळे “भिलवाडा’ व “बारामती पॅटर्न’नुसारच कामकाज सुरू राहणार आहे.
शहरात करोनाचे सहा रुग्ण आढळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार “भिलवाडा पॅटर्न’ राबविण्यात आला. या पॅटर्ननुसार बारामती शहर व तालुका सील करण्यात आले, त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.