बेलग्रेड – भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया याने येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाला गवसणी घातली. या पदकासाठी झालेल्या लढतीत बजरंगने पोर्टो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेराचा 11-9 असा पराभव केला.
या स्पर्धेच्या इतिहासातील बजरंगचे हे चौथे पदक ठरले असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. (Bronze in Belgrade, Bajrang Punia becomes 1st Indian to win 4 medals at world wrestling championships) यापूर्वी त्याने 2013 साली बुडापेस्टमध्ये, 2019 साली नूर-सुलतानमध्ये ब्रॉंझपदक मिळवले होते. तर, 2018 साली बुडापेस्ट येथेच झालेल्या स्पर्धेत रजतपदक पटकावले होते.
Olympic bronze medallist Bajrang Punia wins his fourth medal at the world championships by defeating Sebastian Rivera of Puerto Rico 11-9 to bag a bronze in the men’s 65 Kg weight category at Belgrade.
(file pic) pic.twitter.com/7g85Dp03Y2
— ANI (@ANI) September 18, 2022
बजरंगकडून या स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दिआकोमिहालीसकडून बजरंगचा पराभव झाला. मात्र, जॉनने अंतिम फेरी गाठल्याने बजरंगला रेपिचेजद्वारे पदकाची आणखी एक संधी मिळाली. त्याने रेपिचेज लढतीत अर्मेनियाच्या वेझगेन तेव्हनयानचा 7-6 असा पराभव करत ब्रॉंझपदकाच्या शर्यतीत पात्रता मिळवली.
यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिलांच्या 53 किलो वजनी गटात स्टार खेळाडू विनेश फोगटनेही ब्रॉंझपदक मिळवले होते.