नवी दिल्ली :- बजरंग व दीपक पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची मागणी केल्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) नाराजी व्यक्त केली आहे.
ही चाचणी येत्या 25 व 26 ऑगस्टरोजी होणार असून त्यावेळी हे दोन्ही खेळाडू परदेशात सराव करणार आहेत. या दोन्ही वेळा एकाच कालावधीत येत असल्याने ही मागणी या दोन खेळाडूंनी केली आहे.
मात्र, साईने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याचे उत्तर समाधानकारक वाटले तरच ही सवलत दिली जाइल असेही म्हटले आहे. कझाकिस्तानमध्ये हे दोन्ही खेळाडू सराव करणार असून त्याच कालावधीत ही चाचणी होत आहे.
जागतिक स्पर्धा आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने त्यापूर्वीच्या चाचणीत या खेळाडूंनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे साईने म्हटले आहे.