निवडणूकीच्या आधी ‘आमचं ठरलंय…’ असे सांगणारे भाजपा आणि शिवसेनेचे मात्र निवडणूक निकालानंतर चांगलेच बिनसले आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान ठरल्यानुसार सत्तेमध्ये ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम राहत शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. तर असा कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खोटं ठरवलं आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल लागून एक आठवडा उलटला तरी शिवसेनेचा नूर बघून भाजपने सत्तास्थापनेसाठी अजूनही कोणताही प्रस्ताव न पाठवल्याने कोंडी कायम आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
गोमू संगतीने माझ्या तू येशील का या गाण्यावर उद्धव संगतीने माझ्या तू येशील का! अशी पोस्ट एका युझर्सने केली आहे.
बास्स!! एकदम अशीच परिस्थिती झालीय महाराष्ट्रातील so called “युतीची”. #उध्दव संगतीन माझ्या तू येशील काय! ? #ShivSenaBJP pic.twitter.com/1mZrD1xGQC
— Shekhar Wagh (@TTigerTweets) November 2, 2019
तर अंदाज अपना-अपना चित्रपटातील एक सीनही एका युझरने शेअर केला आहे.
BJP-ShivSena fights pic.twitter.com/gNC1oPNPLh
— Sir Yuzvendra (parody) (@SirYuzvendra) October 30, 2019
असे एक ना अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांचीही त्याला चांगली पसंती मिळती आहे.
फिफ्टी – फिफ्टी !! pic.twitter.com/tWzvICgZsg
— amey tirodkar (@ameytirodkar) November 2, 2019
BJP-Shivsena’s Love Side Effect In #Maharashtra #ShivSena #BJP @AUThackeray pic.twitter.com/lXWqxpNsf8
— Ejaz Ahmed Pathan (@Ej_Pathan) October 29, 2019
#bjpshivsena politics explain. pic.twitter.com/pf5ZYC0LIW
— Azy (@AzyConTroll) October 29, 2019
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत असून तत्पूर्वी सरकार स्थापन करणे महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेच्या भुमिकेकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करण्याचा बी प्लॅन आखला आहे.
#bjpshivsena politics is explained. pic.twitter.com/qTM9XNgKGY
— Arvind Dubey (@InsidiousMafia_) October 29, 2019
Maharashtra situation these days?#bjpshivsena pic.twitter.com/kaJC4vMiAv
— Shadan Ashrafi (@_macho__moron_) October 29, 2019
#bjpshivsena
What happens when Sena tries to poke BJP????
Especially @rautsanjay61 pic.twitter.com/EL07tJoQbX— Vikalp Sharma (@vikalprs) October 29, 2019